नमस्कार मित्रांनो आज आपण समाजातील अनिष्ठ प्रचलित समाज जीवन विषयी जाणून घेणार आहोत. भूत!! डिस्क्लेमर: भूतांवर मनापासून श्रद्धा आणि विश्वास करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्यास क्षमस्व!! लोकांच्या मनात असलेल्या भुताच्या कल्पना! भूतांचे विविध रूप, त्यांचे जाती, धर्म आणि लिंगनुसार वेगवेगळे गुण!! त्यांचे उपाय!!! इत्यादी तथ्यहीन गोष्टी काही लोक मनापासून मानतात. समाजात दबक्या आवाजात बोलल्या जाणाऱ्या या कथा ऐकून, वाचून बरेच लोक जाम घाबरतात तर अनेक त्यातून भरपूर मनोरंजन ही करतात. बरेच लेखक समाजात प्रचलित लोकांना घाबरवणाऱ्या या काल्पनिक पात्रांच्या उपयोग करून त्यांच्या कहाणी भरपूर मीठमसाला लावून लोकांच्या मनात भीतीची लाट उत्पन्न करणारे लेखन करतात! फार मोठा बिझनेस आहे, लेखनाला पाठक ही भरपूर मिळतात. त्याच धर्तीवर बॉलीवूड रामसे टाइप सिनेमा बाजारात उतरवतात. आता कोणी म्हणेल लिहिणारे लिहितात घाबरणारे घाबरतात तुम्हाला काही त्रास आहे? या गोष्टीचा गैरफायदा उचलून बरेच ढोंगी साधू, फकीर, मांत्रिक तांत्रिक छोट्या शहरात, गावात आपले दुकान मांडून बसले आहेत आणि ते उघडपणे अज्ञानी लोकांचे आर्...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा