आधुनिक अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथा
नमस्कार मित्रांनो
आज आपण समाजातील अनिष्ठ प्रचलित समाज जीवन विषयी जाणून घेणार आहोत.
भूत!!
डिस्क्लेमर: भूतांवर मनापासून श्रद्धा आणि विश्वास करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्यास क्षमस्व!!
लोकांच्या मनात असलेल्या भुताच्या कल्पना!
भूतांचे विविध रूप, त्यांचे जाती, धर्म आणि लिंगनुसार वेगवेगळे गुण!! त्यांचे उपाय!!! इत्यादी तथ्यहीन गोष्टी काही लोक मनापासून मानतात. समाजात दबक्या आवाजात बोलल्या जाणाऱ्या या कथा ऐकून, वाचून बरेच लोक जाम घाबरतात तर अनेक त्यातून भरपूर मनोरंजन ही करतात.
बरेच लेखक समाजात प्रचलित लोकांना घाबरवणाऱ्या या काल्पनिक पात्रांच्या उपयोग करून त्यांच्या कहाणी भरपूर मीठमसाला लावून लोकांच्या मनात भीतीची लाट उत्पन्न करणारे लेखन करतात! फार मोठा बिझनेस आहे, लेखनाला पाठक ही भरपूर मिळतात. त्याच धर्तीवर बॉलीवूड रामसे टाइप सिनेमा बाजारात उतरवतात.
आता कोणी म्हणेल लिहिणारे लिहितात घाबरणारे घाबरतात तुम्हाला काही त्रास आहे?
या गोष्टीचा गैरफायदा उचलून बरेच ढोंगी साधू, फकीर, मांत्रिक तांत्रिक छोट्या शहरात, गावात आपले दुकान मांडून बसले आहेत आणि ते उघडपणे अज्ञानी लोकांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करत आहेत. त्यामुळे समाजात जागृती निर्माण करण्यासाठी हा विषय व्यवस्थित खोलात जाऊन या लेखाच्या माध्यमाने पुढे आणायचा प्रयत्न आहे.
भौतिक जगात जन्म झाल्याबरोबर माणसाला एक विशिष्ट वर्ग, भाषा, प्रांत, धर्म आणि देव, समाजीक ओळख म्हणून त्याच्या नावाबरोबर, त्यांच्या नकळत अनाहूतपणे चिटकवलेले जातात. हे सर्व आपल्याला संस्काराच्या रूपात प्राप्त होते, खरं म्हणजे ही जन्मजात प्राप्त झालेली सार्वजनिक ओळख दृश्य स्वरूपात अस्तित्वातच नसते पण आपण ते सर्व इतकं खरं मानतो की त्याच्यामध्ये एकरुप होतो.
कल्पनाविलास करता-करता जन्मापूर्वीचे आणि मृत्यू नंतरचे अस्तित्व आपण आपल्या जीवनाबरोबरच जोडतो. मग काय, अंधश्रद्धेने भारावलेले लोक भुतांना सुद्धा 'जात धर्म' वर्ग भेद, चांगले-वाईट गुण जोडतात. विविध भुतांचे आवाहन करण्याची आणि उतरवण्याची पद्धत ही भुता प्रमाणेच वेगळी असते! संपूर्ण जगातील भूतांचे प्रकार सोडा आपल्या देशात आणि महाराष्ट्रात मानल्या जाणाऱ्या भूतांचे प्रकार बघितले तर ते इतके सारे आहेत की माहिती जमा करून एक भलेमोठे पुस्तक लिहिता येईल!
असंच एकदा ट्रेनमधील वेळेचा सदुपयोग करण्यासाठी इंटरनेट वर काहीतरी माहितीप्रत मनोरंजक बघत असताना यासंदर्भात एक ब्लॉग वाचला.
श्री मंदार कात्रे यांच्या काथ्याकूट मिसळपाव ब्लॉग वर लिहिलेला लेख वाचताना अगदी मजेशीर वाटला. भुतांच्या आजब दुनियेतील गजब गोष्टी मांडणाऱ्या त्या लेखातले काही अंश येथे खाली बघूया. खाली लिंक दिली आहे. कोकणात जितकं भूतवैभव आहे, तितकं ते घाटावर नाही. महाराष्ट्रात फक्त कोकणातच भुताचे 17 प्रकार आहेत.
कोकणी माणसांच्या मनातील भूते.
भूते ही दोन प्रकाराची असतात.
१ त्रास देणारी, २ त्रास न देणारी. ही भूते जंगले, स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात!
कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.
१ वेताळ, २ ब्रम्हग्रह, ३ समंध, ४देवचार, ५ मुंजा, ६ खवीस
७ गि-हा, ८ चेटकीन, ९ झोटिंग, १० वीर, ११ वायंग्या,
१२ म्हसोबा, १३ जखिन, १४ लावसट, १५ हडळ, १६ भानामति, १७ चकवा.
वरील भूतांचे गुण आणि वैशिष्ट्य.
1. वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो!
2. ब्रम्हग्रह /ब्रह्मराक्षस: हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे, ज्याला बुध्दीचा गर्व झाला व त्यातच त्याचा अंत झाला.
3. समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता मरतो तो समंध होतो. हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर, जूनाट झाड, तीठा अशा ठिकाणी लोकांना पकडते! हे एक संतान नसलेला (र्निवंशी) ज्याचे कोणी काही 'उत्तरकार्य' केलेले नसते, त्यापैकी असते. हे भूत कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. जर कोणी याच्या देवथ्यानाच्या आडमार्गे गेला तर तो अधिक पुढे जात नाही.
4. देवचार: हे मागास वर्गीयांचे भूत आहे जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो. ही भूते गावाच्या चारही बाजूला कुठेही असतात.कोकणात ह्यांना डाव, अंग असे म्हटले जाते. कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो. ह्याची सहानभूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर, कोंबडा द्यावा लागतो.
5. मुंजा: हे ब्राह्मणांपैकी भूत असते. जो मुंज झाल्यानंतर सोडमुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते. ह्याचे मुख्य ठाण पिंपळाच्या झाडावर किंवा जुन्या विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.
6. खविस: हा प्रकार मुस्लिमांन भुतांमध्ये मोडतो.हे फार त्रासदायक भूत असते. ज्याला अतिषय क्रुररीत्या मारले जाते, तो मेल्यानंतर खविस होतो, असा समज आहे.
7. गिर्या/गिर्हा - जो माणूस बूडून मेला, किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत असते. हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते. हे फार त्रास देणारे भूत मानतात.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार, खाडीपार करताना ह्याच्या तावडीत 'गावला' तर ते त्याला पाण्यात खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे रात्री कुरले पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव येतो. कोकणात असे मानले जाते की 'जो कोणी' या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो. त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.
8. चेटकीण: हे मागासवर्गीयांचे भूत याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
9. झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.
10. विर: हे भूत क्षत्रीय समाजाच्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो. याला 'निमा' असेही म्हटले जाते.
11. वायंग्या: (11 12 आणि 13 या प्रकाराच्या भूताबद्दल अधिक माहिती मूळ लिंक वर सुद्धा उपलब्ध नाही, वाचकांना माहिती असल्यास अवश्य पोस्ट करावी.:))
12. म्हसोबा:म्हसोबा, वेताळ हे भुतांचे नियंत्रक देव असल्याने, त्यांना भूतयोनीत गृहीत धरता येत नाही.
13 जखिन : सवाष्ण मेल्यावर ‘जखीण’ होते.
14: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते.
15: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते.
16: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते. मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते. (कृपया पत्ता वगैरे मागू नका, माहित नाही!)
17: चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते. सकाळ झाल्याशिवाय याच्या तावडीत असलेल्या लोकांना योग्य रस्ता सापडत नाही!
माहिती स्त्रोत कोकणी भुते | मिसळपाव
——
याव्यतिरिक्त आपले मुसलमान बांधव ‘जीन’ ‘शैतान’ इत्यादी नावाचे भूत मानतात.
(हे जीन फक्त मुसलमान माणसाला पकडते की याची बाधा हिंदू आणि ख्रिश्चन तसेच विदेशी लोकांना सुद्धा होते यावर भूत विशेषज्ञ प्रायव्हेट टीव्हीवर प्राईमटाईम डिबेट करून सामान्यजनांचे ज्ञान वाढवू शकतील.)
रामसे वाल्याची चुडेल, किंवा नेहमी सफेद साडी किंवा पांढरा गाऊन घालते, डेनिम जीन्स घालणार्या मुली भविष्यात चुडेल झाल्या तर काय घालतील, भुतांच्या समाजात भूता बरोबर स्वयंचलितपणे लहान-मोठे होणारे विशेष कपडे असतात का?
राजकीय नेत्याचे भूत वर जाऊन तिथल्या भुतांना 'जातिगत आरक्षण', 'महिला आरक्षण' किंवा काही धार्मिक यात्रेसाठी सबसिडी, त्यांच्यासाठी 'न्याय' वगैरे घ्यायचा तसेच तिथेही भूतानमध्ये फूट पाडून नेतागिरी करायचा प्रयत्न करत असतील का, शोधाचा विषय आहे!
आणि सर्वात महत्वाचे पाण्यात बूच लावून पाण्यात फेकलेल्या बाटली मधले भूत हे विदेशी भूत असते का? हे बाटलीतले भूत आपल्या देशात कोणत्या प्रकारात मोडते?समाजात सद्या खूप अनिष्ट प्रथा चालू आहेत.
१) मुलींना मासिक धर्माचा त्रास - मुलींवर मासिक पाळीच्या काळात खूप बंधने लादली जातात. आताच्या आधुनिक युगात देखील त्यांना सॅनीटरी पॅड सुद्धा काळया पॉलीथीन बॅग मध्ये आणावे लागते.
२) कौमार्य चाचणी - काही समाजात आताही मुलीची लग्न नंतर कौमार्य चाचणी केली जाते. मुलांनी कितीही शेण खाल्लं, तोंड काळ केलं तरी चालते.
३) हुंडा - हुंडा हा आताही घेतला जातो उलट शिक्षित लोकाकडून जास्त प्रमाणात घेतला जातो. फक्त तो आता सोनं आणि वस्तू रुपात घेतला जातो.
उपाय .
१) मासिक पाळी - घरातील स्त्री ने या बाबतीत सक्षम भूमिका घ्यावी.
२) कौमार्य चाचणी - या बाबत वधू व वराने लग्नाआधी बोलून घ्यावे.
३) हुंडा - या वर कोणताही उपाय नाही. ज्यांना नको असतो ते नाही घेत. ज्यांना हवं असतो ते कोणत्याही मार्गाने ते मिळवा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा