संत महिमा
शब्द व अर्थ यांच्या सहकार्यातून साहित्य निर्माण होते.सामर्थ्यशाली शब्दातूनच उत्कट भाव व्यक्त होतो व सध्या शब्दांनाही कवित्व प्राप्त होते.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ||
संत तुकाराम महाराजांना शब्दांच्या सामर्थ्याची केवढी प्रखर
जाणीव होती हे त्यांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.तुकोबांचे शब्द फुलांप्रमाणे नाजूक, सुगंधी व कोमल होते ते धारदार शास्त्राप्रमाणे तीक्ष्ण सुद्धा होते .सर्वच संत शब्दांच्या शक्ती बद्दल जागरूक होते.
आता वंदू कवीश्वर | जे शब्दसृष्टीचे ईश्वर ||
असे समर्थांनी कवी बद्दल म्हटले आहे.कवींनी शब्दांच्या सहाय्याने एक वेगळी प्रतिसृष्टी निर्माण केलीसंतांनीही शब्दांच्या द्वारे आपली अनुभव सृष्टी निर्माण केली.संतांच्या जीवनहेतूचे स्वरूप सर्वसामान्य माणसांपेक्षा फार वेगळे होते सर्वसामान्य माणूस बहिर्मुख असतो तसंच☺तसेच संतांची तुलना केल्यास मात्र ते अंतर्मुख आढळतात.
![]() |
| पवनपुत्र हनुमान ट्रस्ट धनगरवाडी |

one no good information
उत्तर द्याहटवाthanks
हटवा