2 शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी

 नमस्कार मित्रांनो

                   मी गणेश चितळे, आपले ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे.

                                     मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विषयी एक छोटीशी गोष्ट जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात कामी आली.

  मित्रांनो आपण विचार करत असाल की अशी कोणती गोष्ट आहे की जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामध्ये त्यांना उपयोगी आली.

पार्श्वभूमी

मोगल सरदार शाहिस्तेखान ३ वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली नसनी तर राज्याचे दिवाळे निघण्याची पाळी आली असती.

राजगडापासून ३२५ किमी उत्तरेस असलेल्या दक्षिण गुजरातमधील सुरत शहर सुरत त्यावेळी मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते. युरोपआफ्रिका तसेच मध्यपूर्वेशी येथून मोठ्या प्रमाणात व्यापार होई. या व्यापारावरील करातून मोगलांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळे. सुरतेचे शहर मोगलांच्या साम्राज्य सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर असूनसुद्धा सुरतेला बलाढ्य तटबंदी करण्यात आलेली होती. या किल्ल्यावर व आसपास ५,००० सैनिकांची तरतूद होती.

सुरतेतील आर्थिक व भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली. सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने शिवाजी महाराजांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल असे सांगितले. यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला.

आपण विचार करत असाल की मग ही संपत्ती सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे होती का परंतु असे मुळीच घडले नाही.छत्रपती शिवाजी महाराजांनी ती सर्व संपत्ती गोरगरिबांना मध्ये वाटून टाकली आणि रयतेसाठी चोर म्हणणाऱ्या मोगलांचा नाश केला

                                                   असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथा